You are currently viewing तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ उपसा विरोधात याचिका – अशोक राऊळ

तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ उपसा विरोधात याचिका – अशोक राऊळ

तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ उपसा विरोधात याचिका – अशोक राऊळ

“इकोसेन्सेटिव्ह” मध्ये अवैध उपसा सुरू असल्याचा आरोप…

सावंतवाडी

तेरेखोल नदी पात्रात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खनन वाळू व गाळ उपसाच्या विरोधात हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा कलंबिस्त येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक राऊळ यांनी दिला आहे. याचिकेची पूर्वतयारी झाली असून त्यात सावंतवाडी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार तेरेखोल नदीमध्ये २०२२ पासून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू आहे. न्यायालय आणि केंद्रीय पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करून हा सर्व प्रकार सुरू आहे या उपसामुळे नदी पात्राजवळ असलेल्या शेतकरी स्थानिक रहिवासी यांना त्रास होत आहे. अनेकांची जमीन नदीत गेली आहे, घरांना धोका आहे,पुलाना धोका आहे तसेच शेती बागायती नष्ट झाली आहे. तेरेखोल नदीवर कलबिस्त गाव वगळता शिरशिंगे, आंबोली, सावरवाड, वेर्ले, माडखोल गावात हा उपसा सुरू आहे. हा भाग केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे. त्यामुळे या गावात सुरू असलेल्या गौण खनीज वाळू उपसावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आपण हरित लवादाकडे करणार असल्याचे राऊळ यांचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती त्यांचे वकील गुरुनाथ आईर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा