You are currently viewing क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरपीडी हायस्कूलला ६३ हजाराचे बक्षिस…

क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरपीडी हायस्कूलला ६३ हजाराचे बक्षिस…

क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरपीडी हायस्कूलला ६३ हजाराचे बक्षिस…

सावंतवाडी

शाळा क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तालुक्यातील आरपीडी हायस्कूलला १९ वर्षाखालील गटातून ६३ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक श्री. एस . एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा