You are currently viewing आखवणेत साखरेचा ट्रक पलटी, चालक किरकोळ जखमी..

आखवणेत साखरेचा ट्रक पलटी, चालक किरकोळ जखमी..

आखवणेत साखरेचा ट्रक पलटी, चालक किरकोळ जखमी..

गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; उडी मारल्यामुळे क्लिनर थोडक्यात बचावला…

वैभववाडी

साखर वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्यामुळे ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर क्लिनरने बाहेर उडी मारल्यामुळे तो बचावला. ही घटना आज सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास आखवणे भोम पुनर्वसन परिसरात घडली. तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उतारावर स्लीप झाला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जखमी ट्रक चालकाला अधिक उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा