You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशन चा “उत्कृष्ट समाजसेवा” पुरस्कार मनोहर पवार यांना जाहीर..

उज्जैनकर फाउंडेशन चा “उत्कृष्ट समाजसेवा” पुरस्कार मनोहर पवार यांना जाहीर..

केळवद (ता. चिखली) :

बुलढाणा येथील शाहीर, कवी, लेखक, मनोहर पवार यांना यंदाचा उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या संस्थेचा ‘उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार’ संस्थेचे अध्यक्ष मा. शिवचरण उज्जैनकर सर यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. शाहीर मनोहर पवार हे लेखक कवी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी सामाजिक उपक्रम वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच रक्तदान करणे त्याच बरोबर मानव अधिकार ,आणि गरजू व्यक्तींना मदत करणे. भटक्या कुत्र्यांना जेवण देणे कौटुंबिक समुपदेशन, भ्रूणहत्या, बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरण पथनाट्य ,कला पथक, व गाण्यातून समाज प्रबोधन करणे. वाचन संस्कृती रुजवणे. कवी संमेलन साहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. व्यसनमुक्ती करणे इत्यादी सामाजिक कार्य ते सातत्याने करीत आहेत. तसेच ते उज्जैनकर फाउंडेशन चे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष असून विविध संघटनेचे पदाधिकारी आहेत. सदर पुरस्कार हा २९ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे एका समारंभामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या साहित्य व सामाजिक व आरोग्य शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेच. संस्थेचे अध्यक्ष माननीय शिवचरण उज्जैनकर सर यांना टोंगो विद्यापीठाची मानस डॉक्टरेट पदवीसह विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत .तसेच या संस्थेद्वारे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे तीन साहित्य संमेलन घेण्यात येत असतात. महाराष्ट्रासह गोवा या राज्यातही अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्यात आले आहे. त्याच बरोबर यावर्षीही सुद्धा आळंदी पुणे या ठिकाणी डिसेंबर मध्ये संमेलन होऊ घातले आहे. शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक आणि समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती सांस्कृतिक कला तसेच क्रीडा क्षेत्रातही ज्यांनी योगदान दिले आहे अशा सर्व व्यक्तींचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. गेल्या दहा वर्षापासून सतत उज्जैन कर फाउंडेशन विविध उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून राबवित आहे. त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, किशोर बाल साहित्य संमेलन , साहित्य संमेलना बरोबरच फिरते वाचनालय हा उपक्रम सुद्धा ती राबवित आहे. आणि आरोग्य शिबिरे घेत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा