You are currently viewing गौरी महात्म्य

गौरी महात्म्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“गौरी महात्म्य”*

 

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी लक्ष्मी करितो स्वागत

सोन पावले यावे सोन्याचा उंबरा ओलांडूनIIधृII

 

यावे कुंकूवाच्या पाऊला वर पद ठेवीत

सुवर्ण रत्न जडीत ठेवले सिंहासन

व्हावे आरुढ सिंहासनी माते विराजमानII1II

 

आणतात खड्याच्या गौरी,तेरड्याच्या रूपात

गौरींचे मुखवटे कलश्यावर उभे विराजमान

हाती चुडा कपाळी कुंकु विलसे नाकी नथII2II

 

कुंडले श्रवणी शशी मंडळा सम शोभत

अलंकार शोभती मुखावरी भाव प्रसन्न

गळा रुळतो चंपक हार दिसे शोभूनII3II

 

पिवळा पट तो कटी लेऊन साडी नेसून

सौदामिनी शोभे सौंदर्य नेत्र तेजवान

अंबाड्यावर शेवंती मोगरा विराजे छानII4II

 

वाजती पद पंकजी नुपुरे मंजुळ पैंजण

अनुराधा नक्षत्रावर गौरीचे होते आगमन

सुहास वदनी प्रवेशिता घरांत वाटे प्रसन्न्नII5II

 

गौरीपूजन ऐश्वर्याची अनुभूती येत

गणेश माता गौरी महालक्ष्मीचे करू पूजन

सासुरवासिनींचे माहेरी होतं सन्मानII6II

 

अनेक भाज्यांचा दाखवती नैवेद्य भक्त जन

भाजी भाकरी आंबिलाचा दाविती नैवेद्य

नरनारी खेळ खेळती करीती जागरणII7II

 

वाहती सोळा सुती सोळा मोठी पीतवर्ण

अर्पून हळदी कुंकु करिती दोरक ग्रहण

गौरींचे पूजन करता सुखी होई जीवनII8II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा