You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या गोष्टी*

क्रमांक : – भाग १५ वा 

➖➖➖➖➖➖➖➖

कै . शंकर भाऊ देसाई मास्तरांचा अनुभव मी ऐकला होता ..पुढे कालांतराने मी मोट्ठा झाल्यानंतर म्हणजे अगदी उमेदीच्या काळात माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला अनेक वेळा पुणे ,मुम्बई , कोल्हापूर , कोकणात जावे लागत होते. कामानुसार कधी गाड़ी तर कधी बुलेट मोटरसायकल वरुन मी प्रवास करीत असे तेंव्हा मात्र देसाई मास्तरांनी सांगितलेल्या गोष्टीची नेहमी आठवण येत असे. मग प्रवासात देसाई मास्तरांनी सांगीतले ठिकाण आले मी ज्यास्त काळजी घेत असे भितिही वाटत असे. तसेच माझाही लिंबगोवे गावी जाताना आलेला पूर्वीचा अनुभव पण मला आठवत असे . पण आता त्यावेळे पेक्षा खुपच बदल झाला होता . म्हणजे रोड मोठ्ठे झाले होते , रस्त्यावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली होती २४ तास मुंबई बंगलोर मार्गावर वहातुक होती .त्यामुळे भिती वाटत नसे ..मूंबईहुन रात्री 9 ला जरी कारने निघालो तरी रात्री 3 / 4 पर्यन्त आम्ही सातारला पोहचत असू . तर कधी पुण्याहुन तर कामे झाल्यावर अगदी निवांत जेवण करून एखादा पिक्चर बघून रात्री 12 / 12।। वाजता आम्ही सातारला कधी कार तर कधी मोटरसायकल वरुन परत येत असून ..पण डोक्यात नेहमी एकच गोष्ट ! *ते भूत कधी दिसते कां ..?* बरेच वेळ प्रवासात असे काही दिसले नाही ..पण कालांतराने अचानक दोन घटना घडल्या . त्या म्हणजे ..मुंबईहुन येताना रात्री 2/ 2।। वाजता खंबाटकी घाटात आमच्या गाड़ीपुढे लाईटच्या झोतात एक व्यक्ती आमच्या पुढे गाडीच्या वेगात पळत होती , ( हा माझा स्वानुभव आहे ). ते म्हणजे संपूर्ण घाट संपे पर्यंत .आम्हाला किंवा गाडीला काही झाले नाही ,जसा घाट संपला आणी गाडी घाटमाथ्यावर आली तेंव्हा ती व्यक्ती मात्र दिसेनाशी झाली .हा खंबाटकी घाटातील माझा

अनुभव होता . अशा अनेक गोष्टी ऐकल्यामुळे मला भीती कधी वाटली नाही.

पण अशा क्षणी मला जी पहिली व्यक्ती आठवते ती म्हणजे एक गणपतराव देशपांडे ( माझ्या वडिलांचे स्नेही )..त्यांनी ही गोष्ट माझ्या लहानपणी म्हणजे सुमारे १९५७ /१९५८ सालची ..ते स्वतः बस ड्रायव्हर होते . रात्री ते नेहमीच याच खंबाटकी घाटातुन गाड़ी चालवत येत असत तेंव्हा अनेक वेळा त्यांच्या गाडीसोबत एक पिशाच्च्य संपूर्ण घाट गाडीच्या वेगाने पळत असे ..हा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला होता . आणि तो मी ऐकलाही होता . तो अनुभव जो मीच विसरलो होतो त्याची प्रचिती आली होती ..

त्या नंतर पुन्हा एकदा पुणे ते सातारा हा रात्री १२ नंतर बुलेट मोटरसायकल वरुन येत असतांना मला रस्त्याच्या कडेला साधारणतः भुईंज ते लिंबखिंड या प्रवासात एक पांढर मुंडासं बांधलेली धोतर नेसलेली स्थूल अशी व्यक्ती रस्त्याच्या डाव्या बाजुला झाडयाला ( संडासला) बसलेली दिसली .. मी एकदा बघितले तेंव्हा म्हटले कुणीतरी गावकरी बसला असेल ..पण ५ मिनिटानी पाहिले तरी तो रस्त्याच्या कडेला आहेच , बुलेटचे स्पीड नाहीतरी रात्री ९० ते १०० किलोमीटर होते . गाड़ी तर पळते आहे ,अंतर काटते आहे . मी रस्त्याकड़े पहातोय कधी डावीकडे पहातोय तरी ४ ते ५ वेळा ती व्यक्ती आहे तशीच बसलेली ( सुमारे १५/ २० मिनिटे) मला दिसली होती ..हाही मला आलेला अनुभव आहे . पिशाच्च्य हे जनावराला काही करत नाही , बैलगाड़ी , घोडागाडित बसलेल्या किंवा कुठल्याही वहानावर बसलेल्या माणसाला काही करत नाही असे म्हणतात ..पण अनेक ठिकाणी जिथे एक्सिडेंट झाले आहेत , जिथे माणसे दगावलेली आहेत त्या परिसरात रात्री रडण्याचे , किंचाळण्याचे आवाजही येतात असे म्हणतात ..एकंदरीत ही पिशाच्च्य योनी सृष्टित आहे असे दृष्टोत्पत्तीस येते ..असे स्वानुभवाने म्हणावेसे वाटते ….

➖➖➖➖➖➖➖➖

*©विगसा*

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा