You are currently viewing शिरोडा पर्यटन वाढीसाठी समुद्र किनाऱ्यालगतची किमान चार एकर जागा ग्रामपंचायतीला मिळावी!!

शिरोडा पर्यटन वाढीसाठी समुद्र किनाऱ्यालगतची किमान चार एकर जागा ग्रामपंचायतीला मिळावी!!

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी…

शिरोडा

शिरोडा ग्रामपंचायत मध्ये वेळागरचा नितांत सुंदर असा बीच अंतर्भूत होतो. वेळागरची जागा ही एमटीडीसी कडे असून ती यापुर्वीच महाराष्ट्र सरकारने पंचतारांकीत हॉटेलसाठी खाजगी कंपनीला करार स्वरूपात दिलेली आहे. यापूर्वी सदर करारामुळे तीव्र स्वरुपाची आंदोलने झाली असून स्थानिकांना पोलिसांकरवी मारहाणही झाली होती. सरकारने केलेल्या कराराबाबत स्थानिक जनतेमध्ये आजही संभ्रम व नाराजी आहे.शिरोडा येथील निकोप पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज असते, पण शासनाकडून त्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.म्हणून समुद्र किनाऱ्यालगतची किमान चार एकर जागा ग्रामपंचायतीला मिळावी अशी मागणी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्याकडेशिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे. आजची स्थिती पाहता, खाजगी हॉटेल गुप कंपनीला करारानेदिलेल्या त्या ५४ हेक्टर मध्ये येत असलेली जी समुद्र किनायालगतची सुरुची बाग आहे हेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र उरले आहे. त्याभोवती बहरलेल्या पर्यटनातून अनेक सर्व सामान्य स्थानिक ग्रामस्थांना जीवनावश्यक रोजगार प्राप्त होत आहे. याकरिता पर्यटकांना आकर्षित करीत असलेली समुद्रकिनापटूटी लगतची ही किमान ४ एकर जागा आमच्या ताब्यात मिळावी अशी या ग्रामपंचायतची मागणी आहे, जेणेकरुन ग्रामपंचायत शिरोडा बीचवर पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांना चांगल्या सोईसुविधा पुरवू शकेल. कार पाकाँग प्रशिक्षीत बेरोजगारांना व महिला बचत गटांच्या महिलांना पर्यटन पुरक व्यवसासासाठी संधी निर्माण करणे, दुकान गाळे उपलब्ध करणे, वॉटरस्पोर्ट चालू करणे, ओपन जीम, टॉयलेट, बाथर्म, मुलांना खेळण्यासाठी उपयुक्त सुविधा, विविध स्पर्धा कार्यक्रमकांचे आयोजन करणे अशा प्रकारे सोई सुविधा उपलब्ध करुन देवू शकते. यामधून कर स्वरुपात ग्रामपंचायतीचे उत्पन्न तर वाढेलच, त्याचबरोबरीने स्थानिकांना हक्काच्या रोजगाराची संधी मिळू शकेल  असे निवेदनात म्हटले आहे. शाश्वत रोजगार व स्थानिकांना संधी या दृष्टीने आवश्यक असलेल्या या बाबीकडे आपण लक्ष दयावे. भविष्यात होणा-या प्रकल्पामुळे आजची संधी हिरावून घेतली जाणार नाही त्यादृष्टीने सुयोग्य नियोजन व समन्वय असावा,

प्रतिक्रिया व्यक्त करा