You are currently viewing सांगलीतील तरुणाने साकारली धनगर गणेशाची अनोखी मूर्ती

सांगलीतील तरुणाने साकारली धनगर गणेशाची अनोखी मूर्ती

*सांगलीतील तरुणाने साकारली धनगर गणेशाची अनोखी मूर्ती*

सांगली

हणमंतवडिये, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथील 23 वर्षीय तरुण, *चि. संदीप जालिंदर मस्के* यांनी अनोखी गणेश मूर्ती साकारली आहे. कोणत्याही प्रकारच्या मूर्तिकामाचा अनुभव नसतानाही, त्यांनी आपल्या मंडळासाठी स्वतः 6 फुटाची गणेश मूर्ती तयार केली. ही मूर्ती संदीपच्या बाळूमामानगर (मस्केवस्ती) येथील गणेश मंडळासाठी साकारण्यात आली आहे.

संदीप मस्के हा पेशाने ड्रायव्हर असून, आपल्या कुटुंबाला शेतीकामातही मदत करतो. त्याच्या डोक्यात नेहमीच वेगवेगळ्या कल्पना येत असतात, आणि तो त्यावर मेहनत करून काहीतरी नवीन साकारतो. घरासमोर असलेल्या श्री. संत बाळूमामांचे आणि बिरोबा मंदिरातील गजनृत्य पाहून त्याच्या मनात *धनगरी गजनृत्याचा पेहराव असलेली गणेश मूर्ती* बनवण्याची कल्पना आली.

त्यानुसार, गणेशोत्सवाच्या तयारीला दोन महिने आधीच सुरुवात झाली. संदीपने रोजच्या कामातून वेळ काढत, दररोज संध्याकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत या मूर्तीवर काम केले. त्याला मंडळातील इतर कार्यकर्त्यांची मोलाची मदतही मिळाली. केतन मस्के, विशाल मस्के, राहुल मस्के आणि ऋषिकेश मस्के यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी त्याला या कामात साथ दिली.

मूर्ती तयार करताना तिचा साज व पेहराव विशेष विचारपूर्वक ठरवला. संदीपने या मूर्तीला *धनगरी गजनृत्याचा पेहराव* दिला आहे, ज्यामध्ये फेटा, शाल, धोतर, गळ्यात ढोल, कु-हाड, आणि रुद्राक्षमाळ यांचा वापर करण्यात आला आहे. या अनोख्या शैलीने तयार केलेली गणेश मूर्ती चौकातला राजा गणेश मंडळ, हणमंतवडिये येथे पाहण्यासाठी लोक आवर्जून भेट देतात.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा