You are currently viewing कुठल्याही पक्षातील सरकारला तसेच राष्ट्रपुरूषाचे पुतळे न लावण्याचे आदेश राज्यातील सरकारला देण्यात यावे

कुठल्याही पक्षातील सरकारला तसेच राष्ट्रपुरूषाचे पुतळे न लावण्याचे आदेश राज्यातील सरकारला देण्यात यावे

कुठल्याही पक्षातील सरकारला तसेच राष्ट्रपुरूषाचे पुतळे न लावण्याचे आदेश राज्यातील सरकारला देण्यात यावे

त्याऐवजी रुग्णालय शैक्षणिक विद्या मंदिर व वृद्धाश्रम बांधून अशा विविध प्रकारच्या राष्ट्रपुरुषाचे नाव देऊन जनतेला दिलासा द्यावा – राजेंद्र प्रभाकर मसूरकर

सावंतवाडी

महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा मालवण येथे आमच्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दुर्घटना झाल्याने पूर्ण राज्यात व देशात संतापाची व दुःखाची लाट जनतेमध्ये पसरली असण्यासाठी कुठल्याही पक्षातील सरकारला तसेच राष्ट्रपुरूषाचे पुतळे न लावण्याचे आदेश राज्यतील सरकारला देण्यात यावे

त्याऐवजी रुग्णालय शैक्षणिक विद्या मंदिर व वृद्धाश्रम बांधून अशा विविध प्रकारच्या राष्ट्रपुरुषाचे नाव देऊन जनतेला दिलासा देण्याबाबत. असे आदेश न दिल्यास उच्च न्यायालयात मध्ये जाण्याचे धाडस करु शकतात जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी राज्यपाल यांना विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला व माझ्या जनतेला न्याय देण्यात यावा ‌अश्या आशयाचे निवेदन सादर केले आहे.

आज महाराष्ट्रात व देशात अनेक विविध प्रकारच्या राष्ट्रपुरुषाचे पुतळे जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पुतळे उभारले जात आहेत राज्यात असलेले गडकिल्ले सुस्थितीत, शाबुत व डागडुजी न करता कोसळत चाललेले आहे ही बाब चिंताजनक असून ते सुस्थितीत आणण्यासाठी कुठल्याही पक्षातील सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ते न करता आमच्या दैवतांचे महापुरुषांचे पुतळे उभारुन जनतेच्या करातून आलेला पैसा योग्य नियोजन न करता असे पुतळे राज्यात उभारले जात आहेत*

*त्या ऐवजी राज्यात मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल शैक्षणिक उच्च स्तरीय एमबीए तसेच विविध क्षेत्रातील शैक्षणिक सुविधांचे मंदिर तसेच वृद्धाश्रम असे बांधून सरकारकडून त्यांना राष्ट्रपुरुषांचे नामकरण देऊन राज्यातील देशातील जनतेला आदर्श देऊन याचा फायदा जनतेला होऊ शकतो*

*तसेच जनतेच्या हृदयामध्ये प्रत्येक विविध राष्ट्र पुरुषांचे स्थान असून आता कोणत्याही प्रकारचा पुतळा उभारून देखावा करण्याचे काम कोणत्याही पक्षातील सरकारला करायला देऊ नये जेणेकरून त्या पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोलीस दलाला त्रास सहन करावा लागतो याचा ताण पोलिस पथकावर येतो तसेच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची विठमणा काही माथेफिरु व्यक्तींनी केल्यास दंगली घडू शकतात*

*यासाठी आपण नव्याने राष्ट्रपुरुषाचे पुतळे राज्यात बांधायला देऊ नये अशा प्रकारचा आदेश सरकारला देण्यात यावे तसे न झाल्यास माझ्या सारखा नागरिक उच्च न्यायालयामध्ये जाण्याचे धाडस करावे लागू शकेल यासाठी माझा विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला व माझ्या जनतेला न्याय देण्यात यावा*

*राजेंद्र प्रभाकर मसूरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*सावंतवाडी उभाबाजार*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र.9422435760*

प्रतिक्रिया व्यक्त करा