You are currently viewing जागतिक कृषी मंच मंडळावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती…

जागतिक कृषी मंच मंडळावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती…

जागतिक कृषी मंच मंडळावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती…

मालवण
जागतिक स्तरावर कृषी विकासाला चालना देण्यासाठी कार्य करणाऱ्या जागतिक कृषी मंच (WAF) या मंडळावर मालवणचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभू यांच्या निवडीबाबत बोलताना WAF चे चेअरमन रुडी रॅबिंज यांनी प्रभू यांचे कौशल्य हे शेतीचे भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करीत कृषी क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणून जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत पद्धती आणि धोरणात्मक समस्यांचे निराकरण करणे हे मंचाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे

एका संप्रेषणात, WAF बोर्डाचे अध्यक्ष रुडी रॅबिंज म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या भविष्याला आकार देणाऱ्या चर्चेसाठी प्रभू यांचे कौशल्य बहुमोल ठरेल. “जागतिक अन्न आणि कृषी क्षेत्रात श्री प्रभू यांची भूमिका आणि त्यांचे स्थान पाहता ते मोठ्या प्रमाणात या मंचसाठी योगदान देतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला

प्रतिक्रिया व्यक्त करा