You are currently viewing सौरभ धारगळकर सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

सौरभ धारगळकर सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

सौरभ धारगळकर सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

वेंगुर्ला

कणकवली येथे ५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेचा इयत्ता ११ विज्ञान शाखेत शिकवणारा विद्यार्थी कु. सौरभ धारगळकर याने १९ वर्षांखालील गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तो कोल्हापूर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कु. सौरभ याला प्रा.ओंकार गिरप यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समितीची कार्यकारिणी, पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा