You are currently viewing मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराण्याने दिलेला शब्द पाळला – युवराज लखमराजे

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराण्याने दिलेला शब्द पाळला – युवराज लखमराजे

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराण्याने दिलेला शब्द पाळला – युवराज लखमराजे

लवकरात-लवकर काम सुरू होण्यासाठी केसरकरांकडुन प्रयत्न व्हावेत…

सावंतवाडी

राजघराण्याने सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमिन देण्याचा शब्द दिला होता. तो आता कायदेशीररीत्या पुर्ण झाला आहे. त्यामुळे रखडलेले हॉस्पिटल मार्गी लागण्यासाठी आता पुढचा निर्णय मंत्री दीपक केसरकर आणि शासनाने घ्यायचा आहे, अशी माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली.

लोकांची मागणी लक्षात घेता राजघराणे म्हणून आम्ही कुटीर रुग्णालयाच्या परिसरातील अर्धी जागा आम्ही शासनाला देवू केली आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्यास हरकत नाही. त्यामुळे आवश्यक असलेला सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा, असे ते म्हणाले.

श्री. लखमराजे आज ब्रेकींग मालवणीच्या भजन संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजघराण्याकडुन आवश्यक असलेल्या परवानग्या सह्या आम्ही दिल्या आहेत. त्यानंतर त्या प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांच्या सह्या झाल्या आहेत. त्यामुळे आता या प्रश्नावर शासन दरबारी निर्णय बाकी आहे. त्यामुळे याबाबत मंत्री दीपक केसरकरांनी पुढाकार घेवून याबाबत योग्य तो निर्णय घेवून पुढील सकारात्मक भूमिका घ्यावी. ते पुढे म्हणाले, लोकांची मागणी लक्षात घेता राजघराण्याने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रेंगाळलेले हॉस्पिटल मार्गी लागावे, अशी आमची ही प्रामाणिक इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा