You are currently viewing वालावल ग्रामपंचायतची चर्चेचा व कुतूहलाचा विषय बनलेली सभा व ग्रामसभा षडयंत्र कधी थांबणार….?

वालावल ग्रामपंचायतची चर्चेचा व कुतूहलाचा विषय बनलेली सभा व ग्रामसभा षडयंत्र कधी थांबणार….?

*वालावल ग्रामपंचायतची चर्चेचा व कुतूहलाचा विषय बनलेली सभा व ग्रामसभा षडयंत्र कधी थांबणार….?*

*सेना पदाधिकारी विठ्ठल घारे यांचा सवाल*

👉🏿 वालावल गावच्या तंटामुक्त समिती पुनर्गठण करण्याच्या निमित्ताने आयोजित सरपंच व सचिवांच्या मते विशेष सभा व खास सभा
👉🏿 कोरम अभावी तहकूब सभा दिनांक १२ सप्टेंबर, रोजी दुपारी ३.०० वाजता घेण्यात येणार हे निश्चित .
👉🏿सभेचे अधिनियम व कायदे यांचे वाचन होण्यासाठी ग्रामस्थांची आग्रही मागणी
👉🏿आमच्यावर विश्वास ठेवा अधिनियम व कायदे यांचे वाचन करण्याची आवश्यकता नाही असे अध्यक्ष व सचिव यांचे आवाहंन.
👉🏿प्रशासकीय कामकाजाचे तज्ञ ज्येष्ठ नागरिक व ट्रस्टचे अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांना विचारून मार्गदर्शन घ्या असे सभा अध्यक्षांचे भावनिक आवाहन.
👉🏿 ट्रस्ट अध्यक्ष दयानंद चौधरी यांचा चर्चेत बहुमोलाचा सहभाग
————————————————
कुडाळ  :५ सप्टेंबर
वालावल ग्रामपंचायतच्या सभा सध्या तहकूब होत असून, त्या चर्चेच्या व कुतूहलाचा विषय बनत चालल्या आहेत. नुकतीच झालेली दिनांक २९ ऑगस्ट रोजीची खास ग्रामसभा सुद्धा प्रसिद्धी पत्रकातील नमूद केलेल्या विषयांना वगळून वेगळेच विषय घेऊन समोर आली. या सभेचा मुख्य विषय हा तंटामुक्त समितीचे पुनर्गठन हा होता. मात्र कोरम अभावी सभा तहकूब झाल्यानंतर झालेल्या चर्चेत काही सन्माननीय सदस्यांनी तंटामुक्त समितीच्या सभेचे निमंत्रित सदस्य मा.तलाठी व मा.पोलीस पाटील असतात, असे कथन केले. मात्र सचिवानी मा‌.तलाठी महोदय व मा.पोलीस पाटील हे एडिशनल असल्याचे माहिती दिली. तर सरपंच महोदयांनी हे सर्व सदस्य पोट-समितीचे सदस्य असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर सरपंच,व सचिवांचे एकमत होताना दिसले नाही,हे उपस्थित ग्रामस्थांच्या लक्षात आल्याशिवाय रहीले नाही. मात्र यावेळी सन्माननीय सदस्यांनी आपल्याला अधिनियम व कायदे वाचून दाखवावेत असा आग्रह धरला, परंतु सरपंच व सचिवांनी आमच्यावर विश्वास नसल्यास…! ग्रामस्थांचा विश्वास नाही हे मान्य करून उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक व ट्रस्टचे अध्यक्ष श्री.दयानंद चौधरी यांचे मार्गदर्शन घ्यावे असे भावनिक आवाहन अध्यक्षांनी केले. याबाबत सदस्यांचे समाधान न झाल्याने, त्यांनी कायदे व अधिनियमांचे पुस्तक पहाण्यासाठी आग्रह धरला‌. परंतु सरपंच हे प्रत्येक वेळी सचिवांची बाजू घेताना त्यांच्या अनुभवा विषयी कथन करून, ग्रामस्थांनी सरपंच व सचिवांवर विश्वास ठेवावा. असा आग्रह धरत होते. पुढील सभा ठरवताना मात्र आपण सचिव असेनच, असे सांगता येणार नाही, मी रजेवर असेन. असे वारंवार सांगताना पुढील सभेत दुसरा कोणी सचिव असू शकतो, माझ्याकडे इतर ग्रामपंचायतीची चार्ज असू शकतो. अशी न पटणारी काम झटकून देणारी उत्तरे दिली. अशा बेताल वक्तव्यावरून या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसून येते ग्रामस्थांनी ‘खास ग्रामसभा’ ‘ विशेष ग्रामसभा’ याबाबत विचारले असता, ग्रामसभेचेच सर्व नियम या खास ग्रामसभा व विशेष ग्रामसभा यांना लागू होतात‌ आणि ४ किंवा ७ दिवसांनी या सभा पून्हा ठेवल्या जातात. अशी माहिती दिली. या सभांच्या उपस्थिती बाबत ग्रामस्थांना समज करून देणे, हे सरपंचांचे काम आहे, असे सांगितले नुसती ‘सभा’ म्हणून लावली असेल तर जसे विषय ‘आपला आपला गाव आपला विकास ‘ अशा सभाना कोरम ची अट नाही‌ ग्रामसभेचे नियम अशा सभांना लागू होत नाहीत. मी सचिव म्हणून सांगितलेली माहिती खरी आहे, असे स्पष्टीकरण दिले. मुळात ‘खास सभा’ ‘ग्रामसभा’ ‘ विशेष ग्रामसभा’ सभा याबाबत सचिवांचे ज्ञान परिपूर्ण नसल्याचे मत व्यक्त करून कायदे व अधिनियमांचे वाचन करण्याची मागणी ग्रामसभेच्या सदस्यांनी केली. अजेंड्यावर या मुद्द्याचा उल्लेख आला नाही, हि सभा घेण्याची गरज नव्हती‌ सचिवांचा अनुभव असूनही त्याचा उपयोग झाला नाही. असे ग्रामस्थांनी स्पष्ट केल्यावर, सरपंचांनी सचिवांनी आपली चूक मान्य केल्याची माहिती दिली‌ आणि या विषयावर सरपंच महोदय यांनी ग्रामस्थांना अपेक्षित असलेल सारवासारव करणार वक्तव्य करून पुढे ‘नको ते नियम, विषय काढून वाद वाढवू नका अशाने ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते’ अशी भीती व्यक्त केली‌ याबाबत प्रशासनातील माहितगार चौधरी साहेबांना विचारा असेही भावनिक आवाहन अध्यक्षांनी केले. व स्वतःवरची जबाबदारी ग्रामस्थांवर ढकल्ली प्रशासकीय कामकाजाचे तज्ञ व ट्रस्टचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक श्री ‌दयानंद चौधरी साहेब यांनी, नको तो वाद नको, ग्रामस्थांनी मागणी केलेली, ग्रामस्थांना हवी असलेली माहिती सरपंचांनी त्यांना द्यावी असे आवाहन चौधरी साहेबांनी केले. असा सल्ला चौधरी साहेबांनी दिला, व या बहुमोल मध्यस्थीनंतर, नाईलाजास्तव सचिवांनी सभेचे अधिनियम व कायदे यांचे पुस्तक मागवून घेतले, वाचन केले व तहकूब सभेच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

______________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/146577/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा