संजू परब यांच्या मागणीची दखल; प्रशासनाचे मानले आभार..
सावंतवाडी :
उपरलकर देवस्थान नजदीक रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलेला कचरा अखेर नगरपरिषदेने उचलून तो परिसर स्वच्छ केला आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासन दखल घेत तो परिसर स्वच्छ केला. यामुळे श्री.परब यांनी प्रशासनाचे आभार मानले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपरलकर देवस्थान नजदीक रस्त्याच्या कडेला काही नागरिकांकडून कचरा फेकण्यात आला होता. याबाबत श्री परब यांना समजताच त्यांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नगरपरिषदेने दखल घेऊन तो परिसर स्वच्छ केला. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी शहरात येत असतात. परंतु शहराच्या प्रवेशद्वारावर अस्वच्छता असेल तर ती शहराच्या सौंदर्याला बाधा पडेल. त्यामुळे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ती दखल घेऊन त्वरित तो परिसर साफ करावा व कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.