आरवली – सागरतीर्थ किनाऱ्यावर ठेवलेली दुचाकी चोरीस : गुन्हा दाखल
वेंगुर्ले
आरवली – सागरतीर्थ किनाऱ्यावर ठेवलेली दुचाकी बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत दुचाकीचे मालक केशव दिगंबर फटनाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीसांत चोरी चा गुन्हा दाखल झाला आहे.
सागरतीर्थ-टेंबवाडी भागात रहाणारे केशव फटनाईक हे मच्छिमारीस जाण्यासाठी आपल्या एक्टिवा गाडी क्रमांक एम.एच.-०७-ओ.के.- ०४०४ या दुचाकीने किनारी साकळी ६.४५ वाजता गेले होते. ती गाडी चावी काढून घेत नेहमीप्रमाणे किनारी ठेवून मच्छिमारीसाठी गेले. समुद्रात मासेमारी करून सकाळी १०.३० वाजता ते आले. त्यांनी ठेवलेल्या जागेबर आपली दुचाकी दिसली नाही. त्यामुळे घरी जाऊन चौकशी केली मात्र घराकडूनही कुणी ती नेलेली नव्हती. त्या परीसरांत तसेच गावांत त्या दुचाकीची चौकशीही केली पण ती न आढळल्याने केशव फटनाईक यांनी पोलीसांत आपली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.