कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, आम. वैभव नाईक, विधानसभा प्रमुख निलेश राणे, आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
यावेळी सा. बां. विभाग महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य सचिव श्रीम. मनीषा पाटणकर म्हैसकर, सा. बां. विभाग महाराष्ट्र राज्य सचिव (रस्ते) श्री सदाशिव साळुंखे, सा. बां. विभाग महाराष्ट्र राज्य सचिव (बांधकाम) श्री संजय दशपुते, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा, सा. बां. प्रादेशिक विभाग कोकणचे मुख्य अभियंता श्री शरद राजभोज, जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती सा. बां. मंडळ रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता श्री मिलिंद कुलकर्णी, सा. बां. विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता अशी महेंद्र किणी, सा. बां. उपविभाग क्रमांक १ कुडाळचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांनी केली आहे.