You are currently viewing भाजप युवामोर्चा पदाधिकाऱ्याची आरवली सोन्सुरे ग्राम वासियांना गणेश चतुर्थीची आगळी वेगळी भेट

भाजप युवामोर्चा पदाधिकाऱ्याची आरवली सोन्सुरे ग्राम वासियांना गणेश चतुर्थीची आगळी वेगळी भेट

भाजप युवामोर्चा पदाधिकाऱ्याची आरवली सोन्सुरे ग्राम वासियांना गणेश चतुर्थीची आगळी वेगळी भेट

– माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आबा चिपकर

सावंतवाडी
भाजप युवामोर्चा पदाधिकारी याने आरवली सोन्सुरे ग्राम वासियांना गणेश चतुर्थीची आगळी वेगळी भेट म्हणून येथील खड्डेमय रस्त्यावर माती टाकून दिली आहे यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात ग्रामस्थाना चिखलातून ये जा करावी लागत आहे.
आरवली सोन्सुरे येथे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून एका भाजपा युवामोर्चा पदाधिकारी याने स्वखर्चाने गावाच्या खराब रस्त्यां करुन देण्याचे आश्वासन दिले. त्या ठिकाणी काँक्रीटीकारण करुन खड्डे बुजवणे आवश्यक होते मात्र त्या खड्ड्यांमध्ये माती ओतून ते बुझविण्यात आले. यामुळे त्या रस्त्यावर चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना रस्त्यावरून गाडी चालवतो की शेतातून हेच समजेनासे झाले आहे. गाव वासियांना खड्डे मय रस्त्याच्या धोक्यातुन वाचवले की आणखीन धोक्यात घातले अशी चर्चा होत आहे. या मातीमुळे गाड्या घसरन अपघात होत असून गावात याची एकच चर्चा सुरु होताच तातडीने परत जेसीबीच्या साहाय्याने टाकलेली माती बाजुला काढन्यात आली. त्यामुळे पुर्वी होता त्या पेक्षा रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. त्या भाजपा पदाधिकारी यांना ग्राम वासियांना चतुर्थीची आगळी भेट द्यायची होती तर पावसाळी डांबर घालून अथवा काँक्रीटी करण करुन दिले पाहिजे होते . गावातील लोक स्वतः मेहनतीने माती टाकतं होते. चतुर्थी सण जवळ आला की सर्व लोक एकत्र येऊन रस्ता वरील खड्डे बुजवण्याचे काम करायचे . या त्रासापासून मुक्त होण्यासाठी लोकांनी लोक प्रतिनिधीना वारंवार आपले गार्हाणे घातले. वारंवार रस्ता मंजूर झाला अशी आश्वासने मिळत होती. मात्र तसे झाले नाही. लोक प्रतिनिधी यांना जनतेची एवढीच काळजी होती तर या रस्त्यावर सिमेंट कींवा पावसाळी डांबर घालून खड्डे बुजवायला पाहिजे होते. लोकांच्या भावनेशी खेळुन काय साध्य करायचे होते असा सवाल केला आहे. डांबरीकरण येवढे वर्षे रखडलेले का यांचा पाठपुरावा करायला हवा होता.
रस्त्याचे डांबरीकरण कित्येक वर्षे रखडलेले आहे. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतुन पुर्ण होण्यासाठी पाठपुरावा करुन दीवाळी पुर्वी कामास सुरूवात करावे. तो पणं आरवली नाक्यावरून सुरवात करून पुर्ण सोन्सुरा गावात मुख्य रस्ता पुर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा . चिखलमय नको याबद्दल गावातील लोक आभार मानतील असे यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आबा चिपकर यांनी सांगितले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा