You are currently viewing कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करुया

कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करुया

कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करुया

  – जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी

गणेशोत्सवात विविध ठिकाणांहून गणेशभक्त आपल्या जिल्ह्यात येतात. या दरम्यान भक्तांची गैरसोय न होऊ देता त्यांना सुविधा देणे प्रशासनाचे काम आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा न येता सर्वांच्या समन्वयातून व सहकार्याने आगामी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्‍सव पुर्व तयारीच्या अनुषंगाने बैठक पार पडली . यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार  तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या जिल्ह्याला सण, उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. हा नावलौकीक कायम राखण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुया. गणेशोत्सवा दरम्यान नागरिकांना कुठलीही अडचण येवू नये तसेच त्यांच्या अडचणीचे तातडीने निवारण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वायाने काम करावे. रस्‍त्‍यावरील खड्डे डांबर मिश्रीत खडीने बुजविण्‍यात यावे. माती टाकून खड्डे बुजविले जाणार नाही याची दक्षता घेणेत यावी.  खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही तातडीने हाती घेणेत यावी, संबधित विभागाने आपले अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी गणेशोत्सवा पूर्वी पूर्ण करणेत यावी. फोंडा तसेच दाणोली गावांत वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, रेल्वे प्रशासनाशी समन्वय ठेऊन एस.टी. महामंडळाने रेल्वे स्थानकांवर बस सज्ज ठेवाव्यात, व्यापारी तसेच रीक्षा चालकांशी संवाद साधा, महामार्गांवर दिशादर्शक फलक बसवा, अपघात समयी रुग्णवाहिका सज्ज ठेवा.  सदैव विद्युत वितरण विभाग कार्यान्वीत राहील यादृष्टीने पूर्व नियोजन करावे, दुरध्‍वनी व्‍यवस्‍था कोलमडणार नाही याची दक्षता घ्‍यावी, वाहतुकीच्या सोयीसाठी एस.टी बसचे नियोजन करून आवश्यकत्या प्रमाणे वाहने उपलब्ध करुन द्यावेत, गणेश चतुर्थी निमित्‍त येणारे व परत जाणारे प्रवासी यांचेसाठी जादा गाड्यांची उपलब्‍धता याबाबत नियोजन करुन प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय होणार नाही यादृष्‍टीने नियोजन करावे असेही श्री तावडे यांनी सांगितले.

पोलिस अधिक्षक श्री. अग्रवाल म्हणाले  अग्निशामक वाहन अद्यावत व सुस्थितीत ठेवावे, जादा भाडे आकारण्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, रहदाराची ठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्‍यावी, महामार्गावर अपघात झाल्‍यास 108 क्रमांक रुग्णवाहिका सुस्थितीत उपलब्‍ध ठेवण्याच्या व अपघात स्थळी रुग्णवाहिका वेळेत पोहचतील याबाबत नियोजन  करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा