You are currently viewing बीसीजी लसिकरण मोहिम

बीसीजी लसिकरण मोहिम

बीसीजी लसिकरण मोहिम

सिंधुदुर्गनगरी,l

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राअंतर्गत 3 सप्टेंबर  पासून 18 वर्षावरील बीसीजी लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या सव्हेक्षणादरम्यान लस घेण्यास इच्छुक असलेल्या 60 हजार 942 जणांना बीसीजी लस दिली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 60 वर्षाच्यावरील सर्व प्रौढांना व 18 वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या व निकष पुर्ण करणाऱ्या व्यक्तींना बीसीजी लसिकरण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.

            मागील पाच वर्षातील क्षयरुग्ण (2019 ते 2023), क्षयरुग्णांच्या परिवारातील सदस्य (मागच्या 3 वर्षातील), बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी असलेले व्यक्ती, धुम्रपान करणारे व्यक्ती, मधुमेह असणारे व्यक्ती, 60 वर्षाहून अधिक वय, वरील जोखीम गटामध्ये क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांना प्राधान्याने बीसीजी लसिकरण करण्यावर भर देण्यात आलेला आहे.

सन 1978 पासून भारतातील सर्व नवजात बालकांना बीसीजी जस दिली जात आहे आणि लस क्षयरोगाचे गंभीर प्रकार टाळण्याठी लहान मुलाचे क्षयरोगामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सुरक्षित व प्रभावी लस असल्याचे सिध्द झाले आहे. ठराविक कालावधीनंतर क्षयरोगाविरुध्दची या लसीमुळे असलेली प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि प्रौढांना क्षयरोगापासून संरक्षण देण्यासाठी भारत सरकारव्दारे सदर संशोधन करण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत शासन क्षयरुग्णाचे मोफत निदान  व उपचार करीत आहे आणि क्षयरोग टाळ्यासाठी अनेक धोरणे राबवित आहे.

सन 2025 पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व राज्य सरकारव्दारे 18 वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

तरी 18 वर्षावरील बीसीजी लसिकरण मोहिम मध्ये वरील नमूद जोखीम गटातील व्यक्तींनी लसकिरणासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधवा. असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा