You are currently viewing मालवण शहरातील चार मालमत्ता नगरपालिकेकडून सील…

मालवण शहरातील चार मालमत्ता नगरपालिकेकडून सील…

मालवण शहरातील चार मालमत्ता नगरपालिकेकडून सील…

मालवण

मालवण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना विहित पद्धतीने मालमत्ता मागणी देयके बजावून तसेच वेळोवेळी जाहीर आवाहन करुनही थकित मालमत्ता कर न भरल्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज मालवण शहरातील चार मालमत्ता सील करून २ लाखाच्या थकीत कराच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या.

मालवण नगरपालिकेच्या मालमत्ता वसुली पथकातील महेश परब, सोनाली हळदणकर, सुधाकर पाटकर, श्रध्दा आरेकर, भास्कर राऊळ, बस्त्याव फर्नांडिस, विश्राम जाधव, सचिन कासले यांच्यामार्फत शहरातील चार मालमत्तांना सील ठोकण्यात आले. यापुढेही थकित मालमत्ता व नळ कनेक्शन धारकांवर सील ठोकणे, जप्तीची कारवाई नगरपालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा