You are currently viewing जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे १४,१७,१९ वयोगटातील संघ विभाग स्तरासाठी पात्र.

जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे १४,१७,१९ वयोगटातील संघ विभाग स्तरासाठी पात्र.

जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे १४,१७,१९ वयोगटातील संघ विभाग स्तरासाठी पात्र.

आंबोली :

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या चौदा, सतरा व एकोणीस वर्षाखालील तीनही संघांनी जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून विभागस्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.
वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे दिनांक. २८/०८/२०२४ व दिनांक २९/०८/२०२४ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
एकोणीस वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत शुभारंभ अकादमी, मालवण संघाविरुद्ध ३-० गोलनी विजय मिळविला.कॅडेट दिवाकर पाल १ गोल, कॅडेट अथर्व निल्ले १ गोल करून संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत आयडियल कॉलेज कणकवली संघाविरुद्ध १-० गोल नोंदवत विजेतेपद पटकावले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात कॅडेट ओमेश खाडये याने विजयी गोल नोंदवला.
दिनांक २८/०८/२०२४ रोजी झालेल्या स्पर्धेत सतरा वर्षाखालील फुटबॉल संघाने प्रथम सामन्यात आयडियल कॉलेज कणकवली संघाविरुद्ध ४-१ गोलनी विजय मिळविला.कॅडेट हर्ष देसाई,कॅडेट पीयुष गावडे,कॅडेट महादेव दे॓ऊलकर, कॅडेट ॲराॅन फर्नांडिस याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात दोडामार्ग संघाविरुद्ध ६-१ गोल नोंदवत चमकदार कामगिरी केली. कॅडेट हर्ष देसाई,कॅडेट पीयुष गावडे,कॅडेट महादेव दे॓ऊलकर, कॅडेट गौतम खांडेकर, कॅडेट साईश मेंगाने, कॅडेट आदर्श रोटे यांनी प्रत्येकी १ गोल करून संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून दिला.
दिनांक २९/०८/२०२४ रोजी झालेल्या चौदा वर्षांखालील सामन्यात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत कणकवली संघाविरुद्ध २-१ गोलने विजय मिळवला. यामध्ये कॅडेट आर्यन वारेकर आणि कॅडेट दुर्वेश कोटनाके यांनी प्रत्येकी एक गोल केला. अंतिम सामन्यात सैनिक स्कूल संघाने कुडाळ संघाविरुद्ध १-० गोलने विजय मिळवला. कॅडेट आर्यन वारेकरने विजयी गोल नोंदवला.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर चौदा, सतरा व एकोणीस वर्षाखालील वयोगटातील शालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला क्रिडा क्षेत्रातील दर्जा व गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. विभागस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने प्राप्त केला. राष्ट्रीय क्रीडा दिना दिवशी सैनिक स्कूल संघाने जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत उज्वल यश संपादन केले.
फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ व क्रिडाशिक्षक सतिश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डांटस,सर्व संचालक, प्राचार्य नितीन गावडे यांनी करून पुढील विभागस्तराकरिता शुभेच्छा दिल्या.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा