You are currently viewing क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जे डी पाटील यांना प्राप्त

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जे डी पाटील यांना प्राप्त

बांदा :

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन शिक्षकांना प्राप्त झाला असून यामध्ये बांदा येथील पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नंबर एकचे शिक्षक जे डी पाटील यांच्या समावेश आहे. याबाबत त्यांची नाव जाहीर होतात जकाप्पा पाटील यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

शिक्षक जे डी पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील अजून १८ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची शिक्षक म्हणून सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग माटणे येथील शाळेतून झाली. यानंतर सासोली हेदुस येथील शाळेत काही वर्षे ते कार्यरत होते. मागील ५ वर्षापासून ते बांदा येथील पीएमश्री केंद्र शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

उपक्रमशील शिक्षक म्हणून ते तालुक्यात प्रसिद्ध असून त्यांच्या या शिक्षकी क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सोमवारी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून त्यांना शिक्षण क्षेत्रातील सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्याबद्दल जे डी पाटील यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा