*”स्वप्नपूर्ती” कविता संग्रहाच्या कवयित्री लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, वक्ता सौ. प्रणोती कळमकर लिखित अप्रतिम लेख*
*बैलपोळा*
दरवर्षी श्रावण अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो.महाराष्ट्र सह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश तेलंगणा सीमा भागातही हा सण साजरा केला जातो.
आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे.. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असते तरी बैल पोळ्याचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही.या दिवशी बैलाला खांद्याला हळद आणि तुपानी शेकतात.त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झुल,अंगावर गेरूचे ठिपके,शिंगांना बेगड,बाशिंग,गळ्यात कवड्या आणि घुंगऱ्याच्या माळा, नवी वे सन,नवा कासरा, पाया त चांदी शिवाय कर दोऱ्याचे तोडे घालतात…गोड पुरणपोळी आणि सुगरणचा नैवेद्य दाखवला जातो. बैलांना सजवल्यानंतर मिरवणूक काढतात. महाराष्ट्रातील खेड्यात घरोघरी आंब्याचे तोरण बांधतात गावातल्या सर्व बैल जोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र बैलांना घेऊन जमतात
बैलपोळ्याच्या पाडव्याला विदर्भात त्यांना पोळा साजरा होतो. विदर्भात ताना पोळा राजे रघुजी भोसले यांनी 1806 मध्ये सुरू केला
अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते
पहिल्या दिवसाला मोठा पोळा म्हणतात आणि दुसऱ्या दिवसाला तान्हा पोळा म्हणतात
असंच एक प्रसिद्ध पोळा आहे आणि तो म्हणजे आमच्या गावचा म्हणजे सिंदी रेल्वेचा. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे या गावाने मोठ्या नंदीचा चित्ररथांच्या मिरवणुकीसह त्यांना पोळा साजरा करण्याची परंपरा मागील 144 पासून जपली आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा लौकिक मिळाला आहे. ऐतिहासिक परंपरा असलेला टनापोळा किरण पीडा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो शेंडीला पोळा सिटी अशी नवी ओळख आहे त्याची प्रचिती म्हणजे बाजार चौकात नंदीचा पुतळा यावर्षी बसविण्यात आला आहे या दिवशी गावाला जत्रेचे स्वरूप येते चार ते पाच दिवसांपासून गाव सजविण्यात येते संध्याकाळी 40 ते पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत पोळा सण साजरा केला जातो. एक नंदी वाला व झाकी वाल्याचा खर्च एक ते दोन लाखाचा असतो.ढोल ताशाच्याने नादात ट्रॅक्टर ट्रॉली वरून विद्युत रोषणाई करून नंदी त्यांना ऐटीत बाजार चौकात घेऊन येतात. तिथे नंदीची पूजा केली जाते. आणि खूप जल्लोष केला जातो. असे ऐतिहासिक महत्त्व असलेले माझे गाव आहे याचे मला भूषण आहे.
सौ प्रणोती हरीश कळमकर गुरुदेव नगर नागपूर
9834209457