इचलकरंजी : प्रतिनिधी
नांदणी (ता.शिरोळ) येथील साहित्यिका सौ. मेघा धनपाल उळागड्डे यांच्या मोल नात्यांचे कथासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन पंढरपूरच्या श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरचे अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पंढरपूर येथे नुकताच बळीराजा शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळ्यात मोल नात्यांचे कथासंग्रह पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके, डॉ.बी.पी.रोंगे, दिलीप धोञे, नागेश फाटे आदींसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहित्यिका सौ. मेघा उळागड्डे यांना आंतरराष्ट्रीय साहित्यिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्य, उद्योग – व्यवसाय, कला – सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन बागल, सचिव रामदास सौदागर व सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सौ. मेघा उळागड्डे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.