You are currently viewing मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी…

मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी…

मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी…

देवगडात भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध..

देवगड

मालवण राजकोट येथील त्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली आहे. मात्र या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी त्याचे राजकारण केले हे दुर्दैवी आहे. त्यामुळे माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली देवगड भाजपतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला.
शरद पवार,उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आला निषेधचे विविध फलक यावेळी फडकविण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटये, तालुका प्रभारी संतोष किंजवडेकर, भाजपाचे जिल्हा नेते बाळासाहेब खडपे,संदीप साटम, अमित साटम, वैभव करंगुटकर, देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठाकरुल, दिलेश साटम, पंकज दुखंडे,राजा वालकर, उल्हास मणचेकर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दयानंद पाटील, योगेश चांदोसकर, योगेश पाटकर कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर,प्रियांका साळसकर, तन्वी चांदोस्कर, तन्वी शिंदे ,संजना आळवे, आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा