कुडाळ :
मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्याचेच पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकासआघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राभर जोडो मारो आंदोलन पुकारले आहे. कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी एकवटत रविवारी कुडाळ येथील गांधी चौक येथे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत जोडो मारो आंदोलन छेडले.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यानी केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादीचे नेते प्रसाद रेगे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट,काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, शिवाजी घोगळे, शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, पं. स. माजी सदस्य गंगाराम सडवेलकर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तरबेज शेख, अय्यास खुल्ली, अजीम खान, नझीर शेख, ओरोस काँग्रेस शहर प्रमुख महेश परब, आत्माराम ओटवणेकर, जयराम डिगसकर, लालू पटेल,प्रसाद सावंत-भोसले आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.