*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नात्याला कधी नाव ठेवू नये..!!*
रुद्राक्ष असो वा माणूस
एकमुखी भेटणं अवघड असतात
संपतात जेव्हा अशी नाती
उगाच पुरावे मागत बसतात..
कधी काळी आपलीच हक्काची
माणसं अनोळखी होतात
डोळ्यांना डोळे भिडताचं
नजरेतही परकी होतात ..
नियतीच पुढेमागे ठरवत ..जाते
नात्याला कधी नाव ठेवू नये
मनाची फुंकर घावावर घालावी
आपल ओझं आपणचं आवरून घ्यावे
नाती एकदा का उघडी नागडी मांडली
वस्त्रांनी मग ती झाकता येत नाही
शिणल्या नात्यांच्या बोच-या वेदना
भूल देवूनही थांबवता येत नाही..
एकदा का नात पाय दुमडून बसलं
इतर नाती आसूड उगारतात
नात्याला कधीही नाव ठेवू नये
अंगावरचे वळ सरणावरही उरतात
तेव्हा कुठेतरी थांबायलाच हवं
उत्तराची अपेक्षा नात्यात करू नका
आपलीच हक्काची जवळची माणसं
पोरक्या नात्याला परकं करू नका.
बाबा ठाकूर धन्यवाद