नामवंत कलाकरांची कार्यक्रमात उपस्थिती; तालुकाध्यक्ष दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुडाळ :
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी असलेला उत्सव उद्या शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी कुडाळच्या एसटी डेपोच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्वशी, हास्यजत्रा फेम समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, गौरव मोरे, तसेच इतर अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार नारायण राणे आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अशी माहिती भाजपची कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचे या दहीहंडी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. ५ लाख ५५ हजार ५५५ रक्कम असलेली ही दहीहंडी कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून हा दहीहंडी उत्सव कुडाळमध्ये साजरा होत आहे. पण यंदाच्या या दहीहंडी उत्सवाला संवेदनशील देशील झालं आहे मालवणी येथील महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर नारायण राणे आणि निलेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा दहीहंडी उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यक्रम म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहता जरी या दहीहंडी उत्सवाला बॉलीवूडचे कलाकार हजर राहणार असले तरी या ठिकाणी बॉलिवूड नृत्य वगैरे सादर होणार नाहीत. तर त्याऐवजी देशभक्तीपर गीते पोवाडे सादर केले जातील आणि एक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम म्हणून हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे असे दादा साईल यांनी सांगितले.
मराठी आणि हिंदी चित्रपट सुस्तीतील ६ ते ८ नामांकित कलाकार या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला, सेमी अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सई ताम्हणकर, हास्य जत्रा फेम समीर चौगुले, प्रियदर्शनी इंदुलकर, गौरव मोरे हे कलाकार सहभागी होणार आहेत. आतापर्यंत या दहीहंडी उत्सवासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २८ गोविंदा पथकांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये महिला गोविंदा पथक तसेच लहान मुलांचे गोविंदा पथक देखील असणार आहे. हे सर्व संघ चित्तधारक असे मनोरे आणि त्यांची प्रात्यक्षिके या दहीहंडी उत्सव सादर करणार आहेत. त्याचबरोबर निलेश राणे यांची संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे दादा साईल यांनी सांगितले. यावेळी संजय वेंगुर्लेकर, अभय परब पप्या तवटे, विनायक राणे, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, बाळा पावसकर, विजय कांबळी उपस्थित होते.