You are currently viewing वीज कंत्राटी कामगारांना उर्जामंत्र्याचे आश्वासन.

वीज कंत्राटी कामगारांना उर्जामंत्र्याचे आश्वासन.

वीज कंत्राटी कामगारांना उर्जामंत्र्याचे आश्वासन.

जिल्हा अध्यक्ष आनंद लाड महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने दि.24 ऑगस्ट रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानापासून राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या घरावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाच्या 6 व्या दिवशी ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास गुरुवार दि.29 ऑगस्ट रोजी त्यांच्या नागपुरातील देवगिरी या शासकीय निवास स्थानी दुपारी 2 वाजता चर्चा करण्यास बोलावन्यात आले होते. या वेळी संघटनेकडून हरियाना येथील शासन निर्णय व कामगारांचा वस्तुनिष्ठ अहवाल त्यांच्याकडे संघटनेकडून सादर करण्यात आला.

तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ व समानता व कंत्राटदार विरहित कामगार पद्धती करिता हरियाना पॅटर्न या दोन प्रमुख मागण्यांवर संघटना ठाम असून ठोस धोरणात्मक निर्णय तातडीने झाला पाहिजे अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी मांडली

या पूर्वी मा.ना.ऊर्जामंत्री यांनी यापुर्वी अनेकदा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाकडून झाली नाही प्रामुख्याने भरती मध्ये अनुभवी कामगारांना जादा मार्क, वयात सूट,विशेष आरक्षण, बँक अकाउंट द्वारे थेट खात्यात पैसे, कामगारांना मेडिक्लेम व अपघात विमा व भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई न होऊन कामावरून कमी केलेले कामगार कामावर न घेतल्याने कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली व याच मुळे संघटनेला वारंवार आंदोलने करावी लागत असल्याचे महामंत्री सचिन मेंगाळे म्हणाले.

वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून तातडीने मी स्वतः प्रशासना सोबत या सर्व विषया संबंधी संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत मीटिंग आयोजित घेऊन निश्चितच सकारात्मक तोडगा काढू, या कष्टकरी कामगारांना नाराज ठेवणार नाही असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिष्टमंडळ ला दिले.

संघटनेचे च्या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री मा श्री सी व्ही राजेश,विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार,संघटनमंत्री उमेश आणेराव, उपमहामंत्री राहूल बोडके, सचिव अभिजीत माहुलकर, तात्या सावंत, जयेंद्र थुळ, संतोष कोल्हे, समीर हांडे, योगेश सायवनकर, कामगार संघाचे विठ्ठल भालेराव, दत्ता धामणकर उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!*

*बीएससी नर्सिंग (BSc Nursing)* करण्याची सुवर्णसंधी.

*Affiliated to MUHS,Nashik,DMER,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये*

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग , दापोली.*
(Affiliated to MUHS,Nashik,DMER,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*बीएससी नर्सिंग*(BSc Nursing)
Eligibility- 12th Science (PCBE)With MH BSC NURSING CET can apply.

• Duration : 4 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
7887561247/ 9420156771

*जाहिरात लिंक*👇

———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा