*गणेश चतुर्थीच्या कालावधीत अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याबाबत नवनियुक्त उपकार्यकारी अभियंता शैलेश रक्षे यांना दिल्या सूचना*
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक तालुकाध्यक्ष संजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये काल दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडली. यावेळी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण झाल्याने चांगले काम करणाऱ्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य आदींचे अभिनंदन करण्यात आले. वर्षभर कार्यकारिणीत सक्रिय असलेल्या काही पदाधिकारी व सदस्यांनी आपण संघटेसाठी वेळ देऊ शकत नसल्याचे कळविल्याने कार्यकारणीतून त्यांना मुक्त करण्यात आले, आणि नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, तालुका उपाध्यक्ष आनंद नेवगी, संतोष तावडे, समीर शिंदे, सौ मेघना राऊळ, मनोज घाटकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या काल पार पडलेल्या बैठकीसाठी सावंतवाडी तालुका उपकार्यकारी अधिकारी म्हणून नव्याने नियुक्त झालेले श्री.शैलेश रक्षे उपस्थित होते त्यामुळे कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले. सावंतवाडी तालुका कार्यकारिणी व वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत गणेश चतुर्थी जवळ आल्याने गणेश मूर्तिकार यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी पर्यंत तालुक्यात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे प्रयत्न करावेत अशा सूचना नवनियुक्त उपकार्यकारी अभियंता श्री शैलेश रक्षे यांना देण्यात आल्या. या बैठकीत वीज ग्राहकांनी आपापल्या भागातील विविध समस्या मांडून त्यावर तात्काळ उपाय योजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मळगाव येथील सौ.मेघना राऊळ यांनी देऊळवाडी येथे वीज खांब वाकलेला असून वीज वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. त्यावर तात्काळ कारवाई करून वीज खांब बदलून द्यावा अशी मागणी केली. आरोस येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आरोस गावासाठी मळेवाड येथून वीज जोडणी द्यावी अशी मागणी यापूर्वी केलेली होती, परंतु अद्याप सदर मागणी प्रलंबित असल्याने तात्काळ याबाबत विचार व्हावा असे सुचविण्यात आले. इन्सुली येथील उल्हास सावंत यांनी आवश्यक तेथे गार्डिंग करणे बाबत सूचना केली, तर प्रकाश सावंत यांनी देवसू पारपोली रस्त्यावरील वीज वाहिन्या एसटी गाड्यांना लागत असल्याने धोकादायक अवस्थेत आहेत, तेथे तात्काळ उपाययोजना करण्याचे सुचविले. तळवडे बौद्धवाडी येथील वीज खांब वाकलेला असून सदरचा खांब तात्काळ बदलणे व तळवडे येथे होत असलेला वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करणे, तसेच श्री.नागेश तेली (पोलीस अधिकारी) यांनी सी के डब्ल्यू एस इंडस्ट्रियल एरिया मध्ये वीज पुरवठा सुरळीत करणे अशा विविध समस्या वीज ग्राहकांनी नवनियुक्त उपकार्यकारी अभियंता श्री.शैलेश रक्षे यांच्याकडे मांडल्या.
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या चार पदाधिकारी व सदस्यांनी आपण वैयक्तिक कारणासह मुळे संघटनेसाठी वेळ देऊ शकत नसल्याचे कळविल्याने तालुका कार्यकारणी सचिव संजय नाईक (साटेली), सदस्य नंदू परब (आरोस), अनिल गोवेकर (धाकोरे) मोतीराम कामत (दांडेली) आधी सदस्यांना समिती मधून मुक्त करण्यात आले आणि मी लागलीस हायस्कूल मधून शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या व सामाजिक सांस्कृतिक कार्याची आवड असणाऱ्या सौ मेघना राऊळ यांनी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेसाठी स्वेच्छेने काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितल्याने त्यांना संघटनेमध्ये तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले श्री श्रीकृष्ण तेली यांनी देखील संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांची संघटनेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने तालुका कार्यकारिणीच्या विविध गावांमध्ये बैठका घेऊन गावोगावी जनजागृती करीत वीज ग्राहक संघटनेसाठी उत्तम कार्य केल्याने अध्यक्षपदी सर्वानुमते त्यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक आनंद नेवगी यांना कायम ठेवण्यात आले. सावंतवाडी तालुक्याची नव्याने गठीत करण्यात आलेली तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे:
अध्यक्ष श्री संजय भिकाजी लाड, सचिव असलम खतीब (बांदा), उपाध्यक्ष श्री आनंद नेवगी, उपाध्यक्ष श्री संतोष तावडे (ओटवणे) उपाध्यक्षा सौ.मेघना राऊळ (मळगाव), सहसचिव श्री समीर शिंदे (देवसू), खजिनदार मनोज घाटकर (कुणकेरी), तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर (जिल्हा उपाध्यक्ष), सदस्य श्री जगदीश मांजरेकर (व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष) पुंडलिक दळवी, जिल्हा सचिव श्री.दीपक पटेकर, राजेंद्र सावंत(सावंतवाडी) श्री.काशिनाथ न्हावेलकर (सावंतवाडी), श्री श्रीकृष्ण तेली (मळगाव), रामचंद्र राऊळ (तळवडे), गिरीश रेडकर (तळवडे), सुनील सावंत (कलंबिस्त) उल्हास सावंत (इन्सुली), शैलेश कुडतरकर (सावरवाड) आदींची निवड करण्यात आली.
यावेळी शामसुंदर रेडकर तळवडे, जयप्रकाश सावंत देवसु, मनोहर देसाई इन्सुली, जेरोन बस्त्याव माजगाव, विष्णू कदम सांगेली, विनोद मोहिते देवसु, आधी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.