*उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४ सौ.श्रद्धा कदम यांना प्रदान*
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कोल्हापुर येथील राज्य अधिवेशनात केले सन्मानित
वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४ यावर्षी कणकवलीच्या सौ.श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन कोल्हापुर येथे दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने ग्राहक संघटन, ग्राहकाचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य केले जाते.
महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून कार्यकर्त्याचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी राज्य अधिवेशनाचे आयोजन केले जाते. कोल्हापूर येथील अधिवेशनात कोकण विभागाचा “उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४” ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ.श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. श्रद्धा कदम यांनी मागील वर्षभरामध्ये केलेल्या ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहक मार्गदर्शन तसेच सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्यसचिव श्री.अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव, सहसंघटिका सौ. मेधाताई कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील, कोषाध्यक्षा सौ.सुनीता राजेघाडगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.बी.जे.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*