You are currently viewing आरंभ की शेवट…!!

आरंभ की शेवट…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आरंभ की शेवट…!!*

 

हरवलेल्या पत्यांचा पत्ता

शोधत शोधत थकलो

आरंभ की शेवट

मध्यावर येऊन बसलो..

 

उमटायला हवं होत

तिथे चाललोचं नाही

कुठलं अनामिक ओझं

ठसेचं उमटले नाही..

 

सूर्यप्रकाश निघून गेला

चार पावलं अधिकची

मातीलाचं कळलं नाही

आरंभ की शेवटाची..

 

असंख्य स्वप्नांचे प्रदेश

वाटेत निघून गेले

किती वेळ उभा

मोकळे हात भरलेले..

 

आरंभ की शेवट

सांगता येत नाही

फार वेळ झाला

ठसे दिसणार नाही..

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा