You are currently viewing रेखा हरियाण यांना कलारत्न अमृत गौरव पुरस्कार प्रदान

रेखा हरियाण यांना कलारत्न अमृत गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ समिती महाराष्ट्र राज्य आयोजित अध्यक्ष डॉ. बाळासाहेब तोरस्कर ज्येष्ठ साहित्यिक, उद्घाटक डॉ. ख. र. मावळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती), स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे. (अध्यक्ष वर्ल्ड विजन संस्था मुंबई), प्रमुख पाहुणे डॉ. जी. डी. यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था), डॉ. डेरीक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), डॉ. सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार), प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी), भानुदास केसरे, रामकृष्ण कोळवणकर, राजेश कांबळे तसेच डॉ. नॅन्सी अल्ब्युकर्स ह्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रेखा हरियाण यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी रॉकेल या लघुपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. प्रमोद सूर्यवंशी, योगेश पाटील, योगेश हरणे यांनी हा भव्य सोहळा बांद्रा येथील नॅशनल लायब्ररी येथे आयोजित केला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा