You are currently viewing राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित धडक मोर्चा उद्या

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित धडक मोर्चा उद्या

*राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित धडक मोर्चा

ओरोस

*माझे कुटुंब माझी पेन्शन*
कर्मचाऱ्यांना मिळणारी जुनी पेन्शन व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी जिल्हा निहाय सहकुटुंब धडक मोर्चा *बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023* रोजी काढला जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा मोर्चा रवळनाथ मंदिर ओरोस येथून सकाळी दहा वाजता सुरू होईल त्यानंतर सदरील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील प्रांगणामध्ये येईल या मोर्चामध्ये *आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र मंडळी* यांचेसह सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन *राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
सर्व कर्मचारी बंधू-भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना विनंती करण्यात येते की, सर्वांनी सदर मोर्चामध्ये वेळेवर सहभागी व्हावे एनपीएस(NPS) कर्मचाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन आणि आपल्या पुढील भवितव्याचा विचार करून सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी.
जुनी पेन्शन धारक आणि पेन्शनर्स यांनी बेसावध राहू नका.आपली पेन्शन भविष्यात धोक्यात आहे हे लक्षात घ्या. नेहमीप्रमाणे आपण सर्वांच्या पुढे राहून हे आंदोलन यशस्वी करायचे आहे आपल्या पाठीला पाठ लावून NPS धारक सर्व कर्मचारी सुद्धा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील आणि हे आंदोलन यशस्वी करतील.
हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा व्हावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, सर्वांनी सहकुटुंब कोणताही संकोच न करता आंदोलनात सहभागी व्हा.
ही आरपारची लढाई आहे.
आता नाही तर कधीच नाही.
एकच मिशन जुनी पेन्शन.
माझे भविष्य माझी लढाई. असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, यांनी केलेले आहे.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, सचिन माने सहसचिव उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा