समस्या निराकरण करण्यासाठी शासनाने समिती नेमली…
महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटना आणि शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चरने जीएसटीसह अन्य व्यापाऱ्यांच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने दिनांक २७ ऑगस्ट रोजी जाहीर केलेलं व्यापार बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. ऑक्टोंबर २३ पासून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना जीएसटीच्या चाजक अटी पासून होणारा ञास,बाजार समित्यानां दुहेरी भरावा लागणार अन्यायकारक सेस, व्यवसाय कर आदी महत्त्वाच्या मागण्या संदर्भात लेखी निवेदन शासनाला दिले होते. मात्र या बाबतीत शासनाची अनास्था लक्षात घेऊन मसिआने महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या संघटनांची कृती समिती स्थापन करून महाराष्ट्र व्यापी व्यापार बंद आंदोलनाची हाक दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून याला चांगला प्रतिसाद मिळत होता. काल अचानक महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी मसिआचे अध्यक्ष मा. श्री ललित गांधी यांना दूरध्वनीवरून हा संप मागे घ्या आम्ही तुमच्या मागण्यांचा लवकरच सकारात्मक विचार करतो असे आवाहन केले. त्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृहात मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी स्तरावरील तब्बल दोन तास बैठक संपन्न झाली.
मसिआच्या वतीने अध्यक्ष श्री ललित गा़धी व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व समस्या मांडल्या. यावर मा. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व समस्या योग्य असून आपण यासाठी समिती गठीत करू त्यानुसार प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने आपला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावयाचा आहे. या बैठकीला पणन सचिव, नगरविकास सचिव असे दहा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मा. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या शिषटाईमुळे व आमदार माधुरीताई मिशाळ यांच्या मध्यस्थीमुळे याबाबतचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आल्यानेच शासनाने पुढची पावलं उचलली.
तरी उद्याचे व्यापारी बंद आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चरचे मिडिया को चेअरमन ॲड. नकुल पार्सेकर यांनी दिली असून मसिआचे अध्यक्ष व सर्व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यानी केलेल्या विशेष प्रयत्नासाठी जिल्ह्यातील मसिआच्या सर्व गव्हर्नि़ग कौन्सिलच्या सदस्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.