You are currently viewing भीमराव शास्त्री पवार यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार .

भीमराव शास्त्री पवार यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार .

भीमराव शास्त्री पवार यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार .

चिखली वार्ता

येथील श्रीकृष्ण संगीत विद्यालयाचे संचालक ह भ प भीमराव शास्त्री पवार यांना सन्मानाचा ‘पंडित दिगंबर पलूस्कर गौरव ” पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विष्णुदास भावे नाट्यगृह मुंबई येथे सन्मानपूर्वक गौरविण्यात आले . त्या वेळीत्यांचा शिष्य परिवार सोबत होता .

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने संगीत कला क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तींचा व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच संगीत क्षेत्रातील जीवन समर्पित करणाऱ्या योगदान देणाऱ्या व योग्य व्यक्तींचा तसेच पंडित दिगंबर पलूसकर यांचे संगीत या कलेचे चालवणारे वारसांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते .पंडित दिगंबर पुरस्कार यांचे संगीत क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे . कवठळ ,चिखली जिल्हा बुलढाणा येथील ह .भ .प . भीमराव शास्त्री महाराज पवार यांनीही जिल्ह्यांमध्ये संगीताचा वारसा चालवूनअखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्गत श्रीकृष्ण संगीत विद्यालयाची स्थापना केली . व आपला संगीताचा अभ्यासक्रम सुरू ठेवला . त्यांनी कलेची अहोरात्र उपासना केली .व आपली प्रामाणिकपणे उपजीविका चालविली . अनेक शिष्य घडविले .कथा कीर्तने यामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भजनी चाली ‘ गवळणी ,अभंग ‘ यांचे गायन करून गायकांना मार्गदर्शन केले .त्याच बरोबर त्यांनी आपल्या कलेशी नेहमी प्रामाणिक राहून सातत्याने हा कला प्रवास चालूच ठेवला . त्यांनी आकाशवाणी दूरदर्शन येथेही आपली हजेरी लावली .त्यांचे भजन संग्रह तसेच गवळणी संग्रह अल्बम सुद्धा प्रसिद्ध आहेत .त्यांच्या कलेचा वारसा मुले सिद्धेश्वर पवार तसेच राम पवार नातू सुना व त्यांचा संपूर्ण परिवार चालवितात .कवठळ सारख्या अतिदुर्गम ग्रामीण भागांतून जन्मलेले वारकरी संप्रदायाचे ह .भ .प . भीमराव शास्त्री महाराज शिक्षण जरी कमी असले तरीही यांनी आपल्या कलेच्या जोरावर महाराष्ट्र भर आपल्या कलेचा ठसा उमटविला .पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा त्यांनी गायन केले .त्यांच्या या पुरस्काराने गौरविण्यात आल्यानेभीमराव पवार यांनी सुद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल भरून पावलो असे समाधान व्यक्त केले आहे .शरीर थकले असले तरी त्यांची उमीद अजूनही कायम आहे .शेवटच्या श्वासापर्यंत संगीत कलेची सेवा मी करील असे त्यांनी म्हटले आहे . संगीत कला प्रेमी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच बुलढाणा जिल्ह्यासाठी व चिखलीकरांसाठी सुद्धा मोठी अभिमानाची बाब आहे .त्यांच्या या संगीत कला प्रवासाला हार्दिक शुभेच्छा !

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा