You are currently viewing सद्गुरू संगीत विद्यालय विद्यार्थी परीवार यांच्या तर्फे 31 व 1 रोजी सावंतवाडीत ” गुरुवंदना “

सद्गुरू संगीत विद्यालय विद्यार्थी परीवार यांच्या तर्फे 31 व 1 रोजी सावंतवाडीत ” गुरुवंदना “

सद्गुरू संगीत विद्यालय विद्यार्थी परीवार यांच्या तर्फे 31 व 1 रोजी सावंतवाडीत ” गुरुवंदना ”

सावंतवाडी :

श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी विद्यार्थी परीवार यांच्यातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.31 ऑगस्ट व रविवार दि.1 सप्टेंबर रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरूवर्य निलेश मेस्त्री यांचे नवोदित व यशस्वी विद्यार्थी शास्त्रीय गायन वादन करणार आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सन्मा. पं. रामराव नायक, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार व ज्येष्ठ तबला वादक श्री विश्वास जाधव, ज्येष्ठ हार्मोनियम वादक डॉ दिलीप गायतोंडे व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशीचे व्यवस्थापक श्री संदीप वाळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अर्चना फाऊंडेशन संस्थापिका व कोकण विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या सौ. अर्चना घारे-परब, संगीत अलंकार व ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. श्रीराम दीक्षित, विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष ऍड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट प्रथम सत्र सायं ४.३० ते ८:३० असून यामध्ये मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ व विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण होणार आहे. रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी दुसरे सत्र सकाळी ९:३० ते दुपारी १.०० असून यामध्ये मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण व तिसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीला दुपारी ३ वाजता गुरुपुजन व त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते विशारद परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होईल त्यांनतर दु. ४ वाजता गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांचे हार्मोनियम वादन, व सायंकाळी ४:३० ते ७:०० विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन वादन, सायं ७:०० वा. तबला वादक श्री किशोर सावंत यांचे स्वतंत्र तबला वादन व कार्यक्रमाची सांगता सायं ७:३० वाजता डॉ.श्री दिलीप गायतोंडे यांच्या एकल हार्मोनियम वादनाने होईल, त्यांना तबला साथ ज्येष्ठ तबला वादक व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार श्री विश्वास जाधव करणार आहेत. याप्रसंगी सर्व संगीत प्रेमींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन सद्गुरू संगीत विद्यालय शिष्य परिवार व पालक वर्गाकडून करण्यात आले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा