You are currently viewing वैभववाडी येथे 28 ऑगस्ट रोजी वयोश्री योजना नोंदणी शिबिर

वैभववाडी येथे 28 ऑगस्ट रोजी वयोश्री योजना नोंदणी शिबिर

वैभववाडी येथे 28 ऑगस्ट रोजी वयोश्री योजना नोंदणी शिबिर

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने दुसऱ्यांदा आयोजन

वैभववाडी

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ यांच्या वतीने बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वा. या कालावधीत मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या वयोश्री योजना शिबिराला जेष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. खरेदी विक्री संघाने पुन्हा या शिबिराचे आयोजन केले आहे. येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात हे शिबिर पार पडणार आहे. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे जेष्ठ सभासद व वैभववाडी तालुक्यातील ६५ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राहणार आहे.

या योजनेसाठी आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, दोन फोटो, 65 वर्ष पूर्ण वयाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी तालुक्यातील जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा व आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा