*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आज आहे, उद्या नाही*
आज जन्माला आला,
तो उद्या नसणारच!
जन्म मृत्यूचे चक्र असे
अविरत चालू राहणारच!
आज असलास, तरी
उद्या नक्कीच नसणार
हे चिरंतन सत्य
मानवाला कधी कळणार?
आज आहे उद्याचे माहीत, नाही
म्हणतांना मोह काही सुटत नाही
बायको मूल, पैसा अडका
यातून मन निघत नाही
सृष्टीचा निसर्गनियम
सजीवांची नश्वरता, शाप की वरदान?
मोह भोग सुटता सुटत नाही
तरीही
आज आहे उद्या नाही समजत नाही
झाले गेले विसरून जावे
श्वास आहे तोवर जगून घ्यावे
गोड वागण्याने जग जिंकावे
तुमच्या सत्कर्माची फळे फुले
तुम्ही उद्या नसलात तरी,
सगळ्यांच्या मनाला सुखवित राहतील
सुगंध देत राहतील,
मनामनात सदैव टिकून राहतील
आज आहे आज जगून घ्या
उद्या कुणी पाहिला समजून घ्या
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३