मंगेश तळवणेकर यांची कृषिमंत्री यांच्याजवळ मागणी
सावंतवाडी
दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात.आंबा, काजू बागायत व वायंगणी शेतीची मोठी हानी झाली आहे. यापूर्वी शेतीच्या भातकापणीच्या तोंडावर मोठा पाऊस पडल्याने भात शेती बागायतीचे नुकसान झाले आहे त्याचीही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही त्यात जाता हे नवीन संकट शेतकऱ्यांवर आले आहे. या प्रकरणी जातीनिशी लक्ष घालून आंबा, काजूच्या गळलेल्या मोहराची चौकशी समिती नेमून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे