*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी जल्लोषात साजरी :*
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय सहा. शिक्षिका कु. अंकिता गवस यांनी विद्यार्थ्यांना कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते? याविषयी माहिती सांगितली. इयत्ता तिसरीतील कु. श्रियांश सावळ याने श्रीकृष्णाचा व कु. अनोमा कामत हिने राधाचा वेश परिधान केला होता व या विद्यार्थ्यांनी भगवतगीतेतील प्रत्येकी दोन श्लोक म्हणून त्या श्लोकांचा अर्थ सांगितला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘ केशवा माधवा ‘ हे समूहगीत सादर केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या गीताला प्रतिसाद दिला. तर, इयत्ता तिसरीच्या सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत वेश परिधान करून ‘ गोविंदा आला रे आला ‘ या गीताच्या तालावर ऱ्हास नृत्य सादर केले. याकरिता विद्यार्थ्यांना सहा. शिक्षिका सौ. आस्था चव्हाण, कु. प्रगती तेजाम व कु. अंकिता गवस यांनी मार्गदर्शन केले. आपली भारतीय संस्कृती जपणे, परंपरेनुसार चालत येणाऱ्या सणांचा वारसा जोपासणे व विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा यासाठी हा उपक्रम शाळेमार्फत घेण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीच्या या कार्यक्रमात शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करण्यात आली.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*