श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि विद्यार्थीपरिवार आयोजित संगीत महोत्सव 2024 थाटात संपन्न :
कुडाळ
रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या आंदुर्ले निवासस्थानी संगीत महोत्सव संपन्न झाला यावेळी सकाळच्या सत्रात देवता पूजन व महाआरती झाली यानंतर मान्यवर उद्योजक आदरणीय श्री दत्ताजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कुडाळ माजी सभापती श्री संजयजी वेंगुर्लेकर,भजनसम्राट श्री भालचंद्रबुवा केळूसकर,ऍड.श्री रुपेश देसाई, पाट माजी सरपंच सौ. कीर्ती ठाकूर मॅडम, लोकमान्य मल्टीपर्पज परुळे शाखेच्या शाखाधिकारी सौ.गौरी सामंत मॅडम,आंदुर्ले गावचे उपसरंपच श्री चंद्रकिसन मोर्ये,निवृत्त सहाय्यक पोलीस हवालदार श्री अशोक तानावडे साहेब, एस टी बस चे निवृत्त बस चालक श्री मधुकर कांबळी साहेब, जेष्ठ समाजसेवक श्री वसंतमामा कोनकर,जेष्ठ तबला वादक श्री श्यामसुंदर मांजरेकर,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धाटन व दिपप्रज्वलन पार पडले, आदरणीय श्री दत्ताजी सामंत यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला उज्वल भविष्याचा कानमंत्र दिला, तसेच सर्व मान्यवरांनी उपस्थित समस्त विद्यार्थिवर्गाला प्रोत्साहन देणारे संभाषण केले,भजनी डबलबारी बुवा श्री दत्ता पाटील यांनी गुरु महेश सावंत यांच्यावर लिहिलेली कविता सर्वांनां भारावून गेली,सर्व मान्यवरांचा विद्यालयातर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यानंतर भारतीय संगीत कलापीठ केंद्र मधून उत्तीर्ण झालेल्या सिंधुदुर्ग केंद्र च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रके प्रदान करण्यात आली, संगीत कार्यक्रमाची सुरुवात गायक संगीत अलंकार श्री प्रफुल्ल रेवंडकर, संगीत विशारद श्री सागर राठवड तसेच युवा गायक हार्मोनियम वादक श्री अमित उमळकर यांच्या बहारदार मैफल ने झाली यांना पखवाज साथ जेष्ठ पखवाज वादक श्री राजू सावंत तर तबला साथ कु. साईश उमळकर सूरज पालव यांनी केली, यानंतर पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी प्रचलित तसेच अप्रचलीत तालात पखवाज सोलो सादर करून रसिकांची मने जिंकली त्यांना लेहरा साथ श्री दत्तप्रसाद खडपकर व सचिन कातवणकर यांनी केली, यानंतर देवगड च्या डबलबारी फेम गायिका बुवा सौ.साची मुळम यांनी श्री देवी आंदूर्लाई मातेचा अभंग तसेच पखवाज अलंकार गुरुवर्य श्री महेश सावंत यांच्या जीवनावर आधारित गजर अप्रतिम सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेत उपस्थित श्रोत्यांची वाहवा मिळवली,यानंतर गुहागर हुन आलेले खास विद्यार्थी यांनी पखवाज सोलो सादर केला तसेच गुहागर चे प्रसिद्ध बुवा श्री महेश होलंब तसेच श्री धोंडू सातार्डेकर व बांदा येथील जेष्ठ गायक श्री भाऊ मिशाळ यांनी बहारदार अभंग सादर केले यानंतर विद्यार्थ्यांची ढोलकी जुगलबंदी चांगलीच रंगली,कार्यक्रमा दरम्यान आंदुर्ले गावचे उपसरपंच श्री चंद्रकिसन मोर्ये यांनी सरपंच श्री अक्षय तेंडोलकर यांच्या उपस्थितीत विद्यालयातील गरीब मुलाला पखवाज भेट दिला, तर रत्नागिरी चे विद्यार्थी श्री संदेश पारधी यांनी गुरु भेट म्हणून स्वतः बनवलेली सावंत यांना ढोलकी प्रदान केली,दुपारचे स्नेहभोजन श्री महेश सावंत कुटुंबियांनी सर्वाना तृप्तता करून दिले सायंकाळी विद्यालयाचे महागुरू संचालक डॉ.श्री दादा परब,भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर,तसेच ऍड. श्री दिलीप ठाकूर यांचे गुरुपूजन श्री महेश सावंत यांनी तसेच आपल्या मातोश्री श्रीमती विजया सावंत व काका सौ,श्री आनंद सावंत यांचे गुरुपूजन केले तर पखवाज गुरु महेश सावंत यांचे गुरुपूजन समस्त विद्यार्थीपरिवाराने केले, सायंकाळी कार्यक्रमाचा समारोप गोवा येथील दूरदर्शन/आकाशवाणी कलाकार गायक श्री प्रदीप सरमुकादम यांच्या बहारदार संगीत मैफल ने झाली यांना ऑर्गन साथ बुवा श्री भालचंद्र केळुसकर, तबला साथ महागुरू डॉ. श्री दादा परब, तर पखवाज साथ श्री विशाल केळूसकर यांनी केली, संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सिंधुदुर्ग मधील सुप्रसिद्ध निवेदक श्री राजा सामंत, श्री संजय कात्रे सर, मालवणी समलोचक श्री बादल चौधरी, श्री दाजी जुवाटकर तसेच युवा निवेदक श्री अक्षय सातार्डेकर यांनी बहारदार केले,साऊंड सिस्टीम आर.पी. साऊंड चे मालक श्री प्रताप वेंगुर्लेकर, कु. ओमकार वेंगुर्लेकर आणि श्री शिवराम म्हापणकर यांनी केली, रंगमंच सजावट कु. विनायक खडपकर, श्री अमित गावडे तर छायाचित्रण श्री प्रमोद कळंगुटकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीततेसाठी विद्यार्थीपरिवार समस्त पालक वर्ग यांनी मोठा हातभार लावला तसेच दानशूर व्यक्तीनी सहकार्य केले तसेच शास्त्रीय गायक,भजनी कलाकार, कीर्तनकार, पखवाज वादक, दशावतार कलाकार, तसेच समस्त श्रोता वर्ग, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा थाटात संपन्न झाला असे आयोजक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांनी सांगितले
&______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*