You are currently viewing देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी आपल्या कोकणचा विचार करणारे कार्यसम्राट उमेदवार मा. नारायण राणे यांना लोकसभेत पाठवुया – प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी आपल्या कोकणचा विचार करणारे कार्यसम्राट उमेदवार मा. नारायण राणे यांना लोकसभेत पाठवुया – प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी

*भटके विमुक्त आघाडी सिधुदूर्ग जिल्हा – कुडाळ मालवण विधान सभा मतदारसंघ प्रचारदौरा*

 

कुडाळ :

भाजप कुडाळ कार्यालय येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी शांताराम उर्फ बाळा गोसावी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी भाजपा भटके विमुक्त आघाडी मा नवलराज काळे, राष्ट्रीय समाज पक्ष कोकण प्रदेश अध्यक्षा संमिती मयेकर, रासप कुडाळ तालुका अध्यक्ष सौ शिंदे, भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे,सरचिटणीस दिपक खरात, जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश पवार, कुडाळ भाजपा भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष रमेश राठोड, इतर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे,जिल्हा सरचिटणीस दिपक खरात,रसाप कोकण प्रदेश अध्यक्षा मयेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा