मळेवाड येथील घटनेत चिमुरडीच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी डंपर चालकाला अटक*
सावंतवाडी
मळेवाड येथे डंपर पलटी होऊन तीन वर्षीय चिमुरडीच्या मृत्यू जबाबदार ठरल्या प्रकरणी डंपर चालक भिमू लमाणी याला आज उशिरा सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान त्या चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह तिचे वडिल ब्रिजराज दास यांच्या व प्रशासनाच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. अधिक तपासणीसाठी तो कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मळेवाड येथील जंगलमय भागात चिरेखाणीवर काम करणाऱ्या छत्तीसगड येथील परप्रांतीय कामगाराच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. यावेळी चिरे भरलेला डंपर उतारावर गाडी रिव्हर्स आल्यामुळे पलटी झाला होता. यावेळी त्यातील माती अंगावर कोसळल्यामुळे तीन वर्षाची चिमुकली जागीच गतप्राण झाली होती. तिच्या डोक्यावर चिरे सदृश्य दगड पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणात कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्या मुलीचा मृतदेह त्याच ठिकाणी दफन केला होता तर तिच्या आई-वडिलांना गावी पाठवून देण्यात आले. हा प्रकार बाहेर आल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी आज त्या ठिकाणी जाऊन तो मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पाऊस आणि सात ते आठ फूट खोदण्यात आलेला खड्डा लक्षात घेता जेसीबीच्या व मजुरांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान सावंतवाडी किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तपासणीची सुविधा नसल्यामुळे तिचा मृतदेह अधिक तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयात हलवण्यात आला आहे. तर याप्रकरणी दोषी असलेला डंपर चालकासह जेसीबी ताब्यात घेण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. आज सकाळपासून ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी स्वतः पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या समवेत नायब तहसीलदार मनोज मुसळे, वैद्यकीय अधिकारी पोलीस पाटील दिगंबर मसुरकर व दोन महिला पंच व अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडिल यांच्या समक्ष ही मोहीम राबवण्यात आली तसेच मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आला.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*