मालवणातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर…
भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पत्राचे वितरण
मालवण
राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या वतीने तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शासनाच्या माध्यमातून कलाकार मानधन योजनेचा त्यांना मिळणार आहे. या कलाकारांना मंजूर पत्राचे वितरण भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या वतीने तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मुकुंद सावंत कट्टा वरची गुरामवाडी, महादेव गावडे मोगरणे गावडेवाडी, शिवा मिस्त्री मसुरे देउळवाडा, चंद्रकांत पेडणेकर मर्डे कावा मसुरे, रमाकांत पाताडे सुकळवाड पाताडेवाडी, उमेश साईल पळसंब वरचीवाडी, विल्सन गिरकर रेवतळे मालवण, राजेंद्र कोदे कांदळगाव देउळवाडी, विजय कुडाळकर काळसे बागवाडी, नादार तुळसकर देवबाग शिवलकरवाडी, प्रकाश पेडणेकर सुकळवाड भंडारवाडी, धनंजय वायंगणकर पेंडूर सोनारवाडी, मंगेश गायकवाड तिरवडे भाकरवाडी यांचा समावेश आहे हे सर्व प्रस्ताव खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार मानधन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आले आहेत.
भाजपा नेते निलेश राणे यांच्या सुचनेनुसार यापुढेही मालवण कुडाळ तालुक्यातील जास्तीत प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती समिती अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.
यावेळी कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, समिती सदस्य अजिंक्य पाताडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, संदीप परब यांच्यासह पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते.