*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मनातलं कुणी सांगत नाही…!!*
जिथं जे हरवतं
तिथं ते सापडतं नाही
हाका मारून मारून थकतात
मनातलं कुणी सांगत नाही..
पदरी पडलं पवित्र झालं
बसतातं आपलं गाणं गात
डावं उजवं होत राहत
तरीही एकमेकाच्या गळ्यात हात
प्रदुषित गर्व बाळगून सारे
कुणी कुणाशी बोलत नाही
गढूळलेली व्याकूळ शांतता सभोवती
मनातलं कुणी कुणाला सांगत नाही
सारे सुटतात सुसाट धावत
कुणी कुणाकरता थांबत नाही
मिथकं टाळता कशी येतील…जर
उंबरठ्याच्या वळचणीस कुणी थांबणार नाही..
कोशात रमणारी ही माणसं
वेषांतर करून पुढे येत राहतात
मनातल्या संवादाचा अभाव सारा
लोकांना ब्रम्हज्ञान सांगत बसतात
आशयविरहीत असंबद्ध चर्चा
मनातलं कुणी सांगत नाही
गदारोळ होतो मनातल्या गराड्यात
श्वासापलिकडे शब्द ऐकू येत नाही
मनातलं कुणी सांगत नाही
बाबा ठाकूर धन्यवाद