You are currently viewing पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी आवाहन

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी आवाहन

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी आवाहन

  • १८ जानेवारी रोजी होणार परीक्षा
  • १६ सप्टेंबर २०२४ अर्ज भरण्याची शेवटची तारीख

 

सिंधुदुर्गनगरी,

 जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना इयत्ता ६  मध्ये प्रवेश हा नवोदय विद्यालय निवड प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून दिला जातो. या वर्षीच्या इयत्ता ५ वीच्या मुलांना जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची तारीख १८ जानेवारी २०२५ असून ही परीक्षा विद्यालयाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर निश्चित करण्यात आली आहे.

 प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने नि:शुल्क भरण्याची सुविधा https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२४ आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष विद्यालय व्यवस्थापन समिती जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा