*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*स्वप्नांना कवेत घेता…*
घेता स्वप्नांना कवेत
मीच न राहते माझी,
जग ही भासे परके
आहे रे मी फक्त तुझी..।१।
साधी भोळी मी प्रेमीका
गाते तु झे च त रा णे,
मला भेटशील जेव्हा
गाऊ प्रि ती चे च गाणे..।२।
राजपुत्रा सारखाच
स्वप्नामध्ये तू भेटतो,
लळा लागतो तुझाच
जीव ही माझा पेटतो..।३।
चंद्रासारखे वाटते
तुझे हासरे सुमुख,
तुझ्या पाशात वाटते
मला स्वर्गाचेच सुख..।४।
आहे तू किती चंचल
काढतोस माझी खोडी,
तसतशी ही प्रे मा ची
वाढे मनातील गोडी..।५।
मला का रे छळतोस
किती दू र असूनही,
वेड लावी माझ्या जीवा
प्रियकर तू अ सा ही..।६।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*