You are currently viewing हाललं बिऱ्हाड शब्दांचं…!

हाललं बिऱ्हाड शब्दांचं…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हाललं बिऱ्हाड शब्दांचं…!*

 

जन्म गेला सारा

शब्दांच ॠण फेडण्यात

नातेगोते तरी काय

रक्त वायागेलं पिढीजात…

 

हाललं बिऱ्हाड शब्दांचं

झाली बांधाबांध खांद्यावर

जाऊतिथे परका ठरलो

भार पडला लेखणीवर..

 

कोण खोटेखरे देवजाणे

पारखून घेतले शब्दखडे

चढवला कंठावर गळफास

मुशीत काव्य हंबरडे..

 

जन्मभराची केली तयारी

आयुष्याचा गिरी उचलला

दडून बसलो संजीवनीत

श्वासांत शब्दकोंडा उरला..

 

जाळला नरक माझा

जागवली जन्माची दिवाळी

यमदूत माझा मीच

शब्दचं मला ओवाळी…

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा