You are currently viewing ठाकर समाजाचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सुटला

ठाकर समाजाचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सुटला

*विद्यार्थ्यांना त्वरित मिळणा जात पडताळणी प्रमाणपत्र*

*शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला निर्णय

*आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या प्रश्नांसाठी झाली बैठक

*नोकरी आणि निवडणुकीसाठी लागणारे दाखले कागदपत्रांची विना विलंब छाननी करून त्वरित द्या*

 

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे प्रलंबित प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीत सोडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी आवश्यक असलेले जात पडताळणी दाखले त्वरित देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकर समाजाच्या उमेदवारांना आवश्यक असणारे जातीचे दाखले आणि नोकरी साठी द्यावयाचे असलेली जात प्रमाणपत्र कागदपत्रांची छाननी करून विनाविलंब देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान शासनाने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करून हे सर्व प्रश्न निकाली काढले आहेत.त्यामुळे ठाकर समाजाच्या विविध आंदोलने आणि मागण्यांना न्याय मिळाला आहे.

मंत्रालयात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आमदार नितेश राणे यांच्या समवेत, आदिवासी विभागाचे सेक्रेटरी विजय वाघमारे, जात पडताळणी समिती उपाध्यक्ष दिनकर पावरा, सदस्य सचिव श्रीमती दाभाडे , आदिवासी संशोधन आयुक्त पुणे राजेंद्र भंगेल,दक्षता पथक समिती च्या श्रीमती सोनार, श्री. काकडे, ठाकर समाजाचे जेष्ठ नेते मोहन रणसिंग, पंचक्रोशी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकूर, राजेंद्र रणसिंग, चंद्रकांत ठाकूर,कैलास ठाकूर, अमित मराठे, भाई ठोंबरे,विलास म्हस्के,आदी दाधिकरी बैठकीला मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित होते तर संघटनेचे सचिव समीर ठाकूर, महेंद्र मस्के, किरण पालव आणि अन्य कार्यकर्ते ऑनलाईन कॉन्फरन्स द्वारा बैठकीत सहभागी होऊन समाजाचे प्रश्न मांडले. यावेळी आदिवासी सचिव व अधिकारी ,आदिवासी संचालक( डायरेक्टर), संपूर्ण जात पडताळणी समिती यांच्याशी अध्यक्ष दीपक केसरकर आमदार नितेश राणे यांनी चर्चा करत ठाकर समाजाच्या प्रत्येक मुद्द्याची सोडवणूक केली.

जून-जुलैमध्ये विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते ते आजच्या निर्णयाने होणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ठाकर समाजचे आदिवासी दाखले त्या उमेदवारांना जमा करणे आवश्यक आहेत तेही दाखले प्रलंबित राहिलेले होते हे दाखले तातडीने देण्याचे आदेश दिल्याने हा प्रश्न सुद्धा संपुष्टात आला आहे.एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या बहुतांश मागण्या या आजच्या बैठकीत पूर्ण झाला आहे. ठाकर समाज संघटनेच्या मागणीला आमदार नितेश राणे यांचे पाठबळ मिळाल्याने आमचे प्रश्न सुटले असल्याची प्रतिक्रिया पंचक्रोशी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकूर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा